मसाले विक्रीबाबत FDA ची नवी नियमावली,सुट्या मसाल्यांची विक्री करण्यास बंदी;काय म्हणाले तुकाराम मुंढे

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता मसाले उत्पादक आणि विक्रेत्यांकडे वळवलाय.. एफडीएने मसाल्यांच्या उत्पादन प्रक्रियेबाबत नवी नियमावली जाहीर केलीय.. यामध्ये मसाले उद्योजक, उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी कठोर नियम जारी करण्यात आलेत. मसाल्यांमध्ये रंग आणि भेसळयुक्त पदार्थ वापरण्यावर कठोर बंदी असेल. याशिवाय मसल्यांबाबत खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे केल्यास कारवाई केली जाणारेय.. सुट्टे मसाले विक्री करणाऱ्यांना यापुढे विक्रीवर बंदी असेल. याशिवाय रस्त्यांवर मसाले सुकवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणारेय.. सुटे मसाले विकणाऱ्या दुकांनाना या नियमांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.. यापूर्वीही सुटे तेल विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. New FDA regulations on the sale of spices; ban imposed on the sale of loose (unpackaged) spices—what did Tukaram Mundhe say?

संबंधित व्हिडीओ