छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कॅन्टीनवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कंपनीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. गंजलेला फ्रिज, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र साठवणे, तसेच अत्यंत अस्वच्छ परिसरात कामगारांसाठी जेवण तयार केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा ठपका FDA ने ठेवला आहे.