नागपुरातील model mill चाळीची फारच भीषण अवस्था झाली आहे. पावसाळ्यामध्ये कोणत्याही क्षणी ही चाळ जमीनदोस्त होऊ शकते. असं असतानाही इथले लोक जीव मुठीत घेऊन का राहतायत. पाहूया त्या report मधून. ही आहे नागपूरची ब्रिटिशकालीन model मिल चाळ. एकशे दहा वर्षांच्या या इमारतीतील माणसं अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगतायत.