चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात लोहार डोंगरी इथे अतिशय घनदाट जंगलात असलेल्या टेकड्यांवर लोह खनिज आढळून आल्यानंतर त्याचे उत्खनन करण्यासाठी सारेच प्रयत्न करीत आहेत....मात्र, ही खाण इथे झाल्यास वन्यजीवन प्रभावित होईल आणि वाघ मानव संघर्ष तीव्र होईल, असे मत पर्यावरणवाद्यांचे आहे....खाणीला आमदार आदित्य ठाकरे, मनेका गांधी यांनीही विरोध केलाय....विशेष म्हणजे लोहार डोंगरी गावाचा परिसर हा निबीड अरण्याने व्यापला असून, ताडोबाच्या बफर झोनलगत आहे....वाघांच्या आवागमनाचा हा प्रमुख मार्ग आहे....शिवाय बिबटे आणि इतरही वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत....अशा परिस्थितीत 32 हजार झाडं कापून, वाघांचा मार्ग बंद करून खाण होणार असेल, तर सर्वांनीच विरोध केला पाहिजे, अशी भूमिका पर्यावरणवाद्यांची आहे.