राज्यात पूर-संकट! सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील १६ गावांना फटका बसला आहे, उंदरगावात नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मराठवाडा, बीड, जालना, संभाजीनगर जिल्ह्यांना अजूनही पुराचा वेढा आहे. जालना जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर आल्याने भोकरदन-हसानाबाद संपर्क तुटला आहे. तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात डोंगरी आणि तितुर नद्यांना पूर आल्याने अनेक गावे जलमय झाली आहेत.