सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बोरी नदीला पूर आल्याने अक्कलकोट-गाणगापूर रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांकडून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत आहे.