देशभरात पावसाचा कहर सुरूच आहे.. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, पंजाब या राज्यांमध्ये भयंकर पूरस्थिती आहे. तर जम्मू आणि उत्तराखंडमध्ये सतत ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. पंजाबला जोरदार पावसाने झोडपलंय. पंजाबमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. शेकडो नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आलीय.. गुजरात आणि राजस्थानमध्येही पुराने थैमान घातलंय.. या सर्व पूरस्थिताचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..