अन्न व औषध प्रशासनाची Mumbai- Thane मध्ये मोठी कारवाई, 1.27 कोटींचा अन्नसाठा जप्त, 12 परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि ठाण्यात मोठी धडक कारवाई करत तब्बल १ कोटी २७ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला आहे. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ६ विक्रेत्यांची आस्थापने तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. दक्षिण मुंबईतील चेतना, कॅफे आयडियल, बे-रूट, मियान कबाब्स आणि नॅचरल आईस्क्रीमसह ९ नामांकित रेस्टॉरंट्सवर या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याशिवाय ठाण्यातील ३ खाद्य आस्थापनांविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ