मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा प्रसिद्ध केलाय....यानिमित्ताने राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनाच्या वास्तूत पुन्हा एकदा पाऊल ठेवले....त्यामुळे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी खासदार संजय राऊत शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांनी हाताला धरुन राज ठाकरे यांना शिवसेना भवनात नेले. राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा वचननामा आता मुंबईकरांना कितपत भावणार, हे आता आगामी काळात दिसून येईल.