देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एका भेटीने सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम इथं गवईंनी सहकुटुंब भेट दिली आणि त्यावरुन आंबेडकरी समाज आणि पुरोगामी संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय.