Jalgaon|दोन कुटुंबाची फ्री स्टाईल हाणामारी, नवरा बायकोच्या भांडणात नातेवाईकांची जुंपली | NDTV मराठी

जळगावात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबांची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडलाय.पती-पत्नीच्या वादातून ही तुंबळ हाणामारी झाल्याचं कळतंय. जिल्हा अधीक्षक कार्यालय परिसरात कुटुंब समुपदेशनासाठी कक्ष आहे.मात्र इथं समुपदेशनासाठी आलेल्या पती पत्नीच्या नातेवाईकांमध्ये जुंपली. दरम्यान हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असून पेठ पोलीस ठाण्यात दोन्ही बाजुच्या नातेवाईकांनी तक्रारीसाठी धाव घेतलीय.पोलिसांकडून दोन्ही बाजुची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय.

संबंधित व्हिडीओ