Gadchiroli| गोदावरी नदीत 6 मुलं बुडाली, 2 मुलं सुखरूप बाहेर; एकाचा मृतदेह सापडला; 5 अजूनही बेपत्ता

गोदावरी नदीत बुडालेल्या 6 मुलांपैकी एकाचा मृतदेह शोधून काढण्यात यश आलं आहे.उर्वरित 5 मुलांना शोधण्यासाठी शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.तेलंगणा पोलीस मच्छीमार बांधवांच्या साहाय्याने शोध मोहीम राबवित आहे.काल तेलंगणा राज्यातील अंबडपल्ली येथे 8 मुलं पोहायला गेली होती. 2 मुलं सुखरूप बाहेर, 6 पैकी 5 अजूनही बेपत्ता आहेत.परिसरात काळीज पिळवटणारे वातावरण झाले आहे.कटारमचे डीएसपी राम मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथक आणि एसडीआरएफच्या मदतीने काल रात्रीपासून सतत शोध मोहीम सुरू आहे. बाहेर काढलेल्या मृतदेहाचे नाव रक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित व्हिडीओ