गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शिवनी नदीच्या पुलावर प्रवासी बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्याची दुरवस्था आणि जुन्या-भंगार अवस्थेतील बसेसमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.