गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील सोनसरीमध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आठवीतील 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय.. राणू हलामी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे आश्रमशाळा परिसरात शोककळा पसरली आहे. सोमवारी दुपारी तिचे आई-वडील तिला भेटण्यासाठी आश्रमशाळेत आले होते. त्यानंतर काही वेळाने ही घटना उघडकीस आली. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. या प्रकरणी पोलीस तपास करतायत..