Gadchiroli Flood | गडचिरोलीतील भामरागड तालुक्यावर पुराचं संकट, सध्याचे अपडेट काय? | NDTV Marathi
Flood crisis in Gadchiroli's Bhamragad taluka: What are the latest updates?
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यावर पुराचे संकट ओढावले आहे. छत्तीसगडमधील इंद्रावती नदीला आलेल्या पुराचा फटका भामरागड तालुक्याला बसला असून, पर्लकोटा नदीलाही पूर आला आहे. पुराचे पाणी भामरागड शहरातील अनेक घरांमध्ये शिरले आहे. परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तब्बल ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.