मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवात विविध मंडळांकडून हटके आणि आकर्षक देखावे साकारले जात आहेत.मालाडच्या शिवकृपा मित्र मंडळानं यंदा चक्क कोकणकन्या एक्सप्रेसचा भव्य देखावा साकारला आहे… कोकण आणि मुंबईकरांचं एक वेगळंच नातं आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी कोकणकन्या एक्सप्रेस ही विशेष जिव्हाळ्याची ट्रेन आहे. याच कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिकृती शिवकृपा मित्र मंडळानं गणपती बाप्पांच्या मंडपात उभी केली आहे… याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी...