Gangster Goldy Brar आता अमेरिकेत Most Wanted; कोण आहे गोल्डी ब्रार ? NDTV मराठी

अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं त्यांची टॉप १० मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांची यादी जाहीर केलीय.आणि त्यात गँगस्टर सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी ब्रारचा समावेश आहे. ब्रारची माहिती देणाऱ्याला सुमारे १० लाख डॉलर म्हणजेच सुमारे साडेनऊ कोटींपर्यंतचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा महत्त्वाचा सदस्य आहे. अमेरिकेत तो या टोळीचा ऑपरेशनल लीडर असल्याचं सांगितलं जातं.दरम्यान लॉरेन्स आणि गोल्डीवर कॅनडातील खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप आहे. ऑपरेशन हार्ड बॉल: अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांनी संयुक्तपणे राबवलेल्या 'ऑपरेशन हार्ड बॉल' या आंतरराष्ट्रीय तपास मोहिमेनंतर गोल्डी ब्रारवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर खंडणी, अमली पदार्थांची आणि शस्त्रास्त्रांची तस्करी, आणि संघटित गुन्हेगारी कारस्थान रचल्याचे अनेक गंभीर आरोप आहेत

संबंधित व्हिडीओ