Global News| अमेरिकेचा भारताला नवा दणका, अमेरिका भारतावर 100% टॅरिफ लावणार

अमेरिका भारताला नवा धक्का देण्याच्या तयारीत आहे.अमेरिकन सिनेटमध्ये एक विधेयक सादर कऱण्यात आलंय. त्यात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याची रणनीती आखण्यात आली आहे. अमेरिका आता भारत, चीन, हंगेरी, स्लोव्हाकिया, आणि अझरबैजान या पाच देशांवर 100% शुल्क लावणार आहे.या विधेयकानुसार, या देशांतून येणाऱ्या वस्तूंवर 100% पर्यंत शुल्क (टॅरिफ) आकारले जाऊ शकते.तसेच, रशियाच्या ऊर्जा, आर्थिक आणि संरक्षण प्रणालीवरही नवीन निर्बंध लादण्याची तरतूद आहे.यापूर्वी विधेयकाच्या सुरुवातीच्या मसुद्यात 500% शुल्क (टॅरिफ) लावण्याचा प्रस्ताव होता.परंतु नंतर तो कमी करून 100% करण्यात आला.रशियाच्या तेल व्यवसायावर आर्थिक दबाव आणून त्याची युद्ध लढण्याची क्षमता कमी करण्यास अमेरिकेतील बहुतांश सिनेटर्सचा पाठिंबा आहे.

संबंधित व्हिडीओ