पाकिस्तान नेहमी अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत असतो, पाकिस्तानी पंतप्रधान आणि नेते नेहमीच डोनाल्ड ट्रम्प यांना खूष करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा उल्लेख करत संसदेत अमेरिकेवर कडक शब्दात टीका केली आहे. . 1999 नंतर पाकिस्तानने अमेरिकन पाठिंबा मिळविण्यासाठी पुन्हा युद्धात सामील होण्याचा निर्णय घेतला, मात्र यासाठी देशाला मोठी किंमत मोजावी लागली. ख्वाजा आसिफ यांनी या सर्व निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर खापर फोडलं, अमेरिकेने पाकिस्तानचा वापर टिश्यू पेपरसारखा आणि टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट केला आणि नंतर पाकिस्तानले वाऱ्यावर सोडून देण्यात आले.