Global News| नेतान्याहूंनी मुद्दाम हमास हल्ला होऊ दिला? 10 दिवसांपूर्वीच मिळाली होती हल्ल्याची टीप?

नेतान्याहूंना ७ ऑक्टोबर २०२३च्या हमास हल्ल्याची कल्पना होती... हा दावा एका अहवालातून करण्यात आलाय.यूएईचे अध्यत्र मोहम्मद बिन झायेद यांनी नेतान्याहू यांना ही गुप्तचर माहिती दिली होती. मात्र नेतान्याहू त्यांनी ती बातमी गांभीर्यानं घेतली नाही असंही एमबीझेड यांनी म्हटलंय.आणि त्यानंतर सुरू झालं ते हमासबरोबरचं युद्ध...हे युद्ध सुरू झाल्यामुळे नेतान्याहू यांची राजकीय कारकीर्द ढासळता ढासळता वाचली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यूएईला ही माहिती कुठून मिळाली. तर एमबीझेड यांच्या सल्लागार मंडळात गाझामधून स्थलांतरीत होऊन अबूधाबीमध्ये स्थिरावलेल्या एका व्यक्तीचा समावेश होता. आणि त्या सल्लागारानं हमास प्रमुख याह्या सिनवार अशाप्रकारच्या हल्ल्याची योजना आखत असल्याचं त्यांना सांगितलं. झायद यांनी नेतान्याहूंना याबाबत सांगितलं की खूप मोठा रक्तपात होणार. पण नेतान्याहू यांनी इस्रायल अशाप्रकारच्या सर्व हल्ल्यांना तयार असल्याचं सांगितलं होतं. मात्र इस्रायलनं या प्रकारच्या अहवालाचा दावा फेटाळून लावलाय तर यूएईनं या बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. Did Netanyahu deliberately allow the Hamas attack to happen? Was a tip-off about the attack received 10 days in advance?

संबंधित व्हिडीओ