युरोपमधील वणव्याचं लोण आता अल्बानियामध्येही पोहोचलंय. अल्बानियामध्ये रविवारी भीषण वणवा पेटलाय. ही आग विझवण्यासाठी सुमारे १००० अग्निशमन जवानांनी धाव घेतली. हजारो हेक्टरवरील जंगलावर आणि हिरवळीवर ही आग पसरलीय. यात काही घरांचंही नुकसान झालंय.अल्बानियाच्या आग्नेय परिसरातील नदीकिनारी भागात सुमारे १० ठिकाणी आगी लागल्यात. याचा अनेक घरांना धोका निर्माण झाला. ऐन सुट्टीच्या हंगामातच हे वणवे पेटल्यानं स्थानिक व्यावसायिकही चिंतेत आहेत. दरम्यान आग विझवताना अग्निशमन दलाचे काही जवान जखमी झालेतय. डेल्विन जिल्ह्यात आगीत सापडलेल्या एका व्यक्तीला वाचवताना ते जखमी झाले. आग विझवण्यासाठी आता हंगेरी, क्रोएशिया आणि इटलीच्या विमानांचीही मदत घेतली जातेय