जर्मनीच्या एका राज्यात निवडणूक काय झाली, साऱ्या युरोपच्या राजकारणात चिंतेचं वातावरण पसरलंय. जर्मनीतील सॅक्सोनी-आनहाल्टमध्ये सप्टेंबर 2026 च्या निवडणुकीत अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (AfD) ने मोठा विजय मिळवला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत एक उजव्या विचारसरणीचा पक्ष एखाद्या राज्यात सत्तेच्या इतका जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.AfD परदेशातून येऊन जर्मनीमध्ये स्थायिक झालेल्या लोकांबाबत आणि समलिंगी विवाहाबाबत कठोर भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो. यात पक्षाच्या प्रमुख अॅलिस वीडल यांचा वाटा महत्त्वाचा मानला जातो.अर्थतज्ज्ञ असलेल्या अॅलिस वीडल यांची कौटुंबीक आणि वैयक्तिक पार्श्वभूमी त्यांच्या पक्ष आणि विचारधारेशी समांतर तसंच विरोधाभासी ही आहे. Is German Nazism reviving? Resounding victory for the far-right AfD in Germany.