Global News| ट्रम्प-पुतीन यांच्यात फोनवरुन चर्चा, युक्रेन-रशिया धुमश्चक्री थांबण्याची शक्यता वाढली

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून रशिया आणि युक्रेन यांच्या सुरु असलेल्या युद्धाविषयी चर्चा झाली. युद्ध थांबविण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरु करण्यास तयार असल्याचं राष्ट्रपती पुतीन यांनी मान्य केल्याचं अमेरिकचं म्हणणं आहे. या फोन संभाषणाची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वेलादोमिर झेलेन्स्की यांनाही दिली जाणार आहे. पुतीन आणि ट्रम्प यांच्या झालेल्या फोन वरील संभाषणाला मॉस्कोमधील पुतीन यांचं कार्यलय क्रेमलिननेही दुजोरा दिला आहे. याशिवाय ट्रम्प आणि पुतीन यांच्यात एकमेकांच्या देशांना भेट देण्यासही सहमती दर्शवल्याचं दोन्ही देशांनी म्हटंलय.

संबंधित व्हिडीओ