चीनच्या शेनझेन शहराकडे आज साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. कारण तीन महासत्तांचे प्रमुख पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत
एकमेकांशी केवळ हस्तांदोलनच करणार नाहीत तर महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्यात चर्चाही अपेक्षित आहे.
चीनच्या शेनझेन शहरात एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशनची बैठक होतेय. आणि त्यासाठी
अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष पुतीन हे चीनमध्ये आहेत. त्यामुळे चीनी अध्यक्ष जिनपिंग यांच्या
यजमानपदाखाली हे दोन्ही नेते भेटणार आहेत. म्हणजेच पुतीन-ट्रम्प-जिनपिंग हे रशिया-अमेरिका-चीन यांचे प्रमुख म्हणून भेटत आहेत.
ही पहिलीच त्रिपक्षीय भेट जागतिक राजकारणासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि निर्णायक मानली जात आहे.
या भेटीची तुलना १९४५मध्ये झालेल्या याल्टा परिषदेशी केली जातेय.
आजच्या भेटीचं महत्त्व जाणून घेण्याआधी याल्टा परिषद जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं का महत्त्वाची ठरली ते आधी पाहूया