रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आता वाटाघाटींना वेग आलेला दिसतोय. कारण म्युनिचमध्ये झेलेन्स्कींची भेट घेतल्यानंतर अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो हे सौदी अरेबियात दाखल झाले आणि तिथं त्यांनी रशियन शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्याचवेळी या चर्चांकडे युरोपीय देशांचंही बारकाईनं लक्ष आहे. युक्रेनचं शिष्टमंडळही अध्यक्ष झेलेन्स्कींसह सध्या रियाधमध्ये आहे. काय नेमकं घडतंय रियाधमध्ये.युद्धबंदीचा पाया रियाधमध्ये रचला जातोय का आणि मुळात खऱंच युद्धबंदी होते का पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट.