अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बहुचर्चित बैठक पार पडली आणि यातून भारताच्या हाती मोठं यश लागलंय. ते म्हणजे मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यार्पण. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर आता अध्यक्ष ट्रम्प यांनीही मोदींच्या भेटीनंतर त्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलंय.