चीन तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीवर महाधरण उभारणार आहे. वीजनिर्मितीसाठी चीनकडून हे जगातील अभियांत्रिकी आश्चर्य उभारलं जातंय. मात्र हे महाधरण भविष्यात भारतासाठीच नव्हे तर दक्षिण आशियासाठी देखील वॉटर वेपन किंवा वॉटरबॉम्ब ठरण्याची भीती व्यक्त होतेय. आणि या भीतीला आधार आहे तो नव्यानंच करण्यात आलेल्या एका संशोधनाचा. हे संशोधनही कुणा त्रयस्थांनी केलेलं नाही तर स्वतः चीनच्या शास्त्रज्ञांनीच केलंय. त्यांनीही या धरणाच्या बांधणीशी संबंधित काही चिंता व्यक्त केलीय. पाहूया काय आहे चीनचा वॉटरबॉम्ब..
Global Report | China’s mega-dam on the Yarlung Tsangpo River in Tibet; what is China’s ‘water bomb’... | NDTV Marathi