Global Report| पूरमय चीन, पुरात बुडालेल्या चीनसमोर आता पुनर्बांधणीचं आव्हान; चीनमध्ये काम कसं सुरुय?

चीनला यंदा भीषण पुरानं चांगलंच झोडपून काढलंय. मग चीनचा तो उत्तर भाग असो किंवा नैऋत्य किंवा दक्षिण चीन... चीनच्या कानाकोपऱ्यात यंदा पुरानं हाहाकार उडवून दिलाय. कमी वेळेत भरपूर पाऊस असंच चित्र या सर्व ठिकाणी पाहायला मिळालं. या पुरामध्ये शहरं, गावांचं अतोनात नुकसान झालंय. अनेक रस्ते उखडून निघाले, पूल खचले. आता सध्या पूर हळूहळू ओसरू पाहतंय. आता सध्या बीजिंगच्या आजूबाजूच्या पूरग्रस्त भागातून चिखलगाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय. पुरात बुडालेल्या चीनसमोर आता पुनर्बांधणीचं आव्हान आहे. पाहूया चीनमध्ये हे काम कसं सुरुय.

संबंधित व्हिडीओ