अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ प्रेम हे अनेक उद्योगांचा प्राण कंठाशी आणू पाहत आहे. अनेक देशातील वस्तूंवर आता अमेरिकेत टॅरिफ लागणार असल्यानं त्या वस्तू महागतील आणि त्यांची अमेरिकेतली मागणी कमी होईल. परिणामी उत्पादन घटणार आहे. या कोंडीतून कसं बाहेर पडणार याची विवंचना या छोट्या उत्पादकांना आहे. जर्मनीतील लाकडी बाहुले बनवणाऱ्या इंडस्ट्रीलाही या टॅऱिफचा मोठा ताण सहन करावा लागणार आहे. पाहूया एक रिपोर्ट.