पंतप्रधान मोदींचा इंडोनेशिया दौरा हा खास ठरला आहे. तीन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराला भेट दिली. ११०० वर्ष जुनं शिवमंदिर आता भारताच्या मदतीनं कात टाकणार आहे. खरंतर इंडोनेशिया म्हणजे मुस्लिमबहुल देश तरीही एका प्राचीन हिंदू संस्कृतीचं प्रतीक जपण्यासाठी तिथं प्रयत्न केले जात आहेत हे विशेष, त्यातच पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे भारत आणि इंडोनेशियातील सांस्कृतिक, ऐतिहासिक संबंधांना नवा उजाळा मिळालाय.