संपूर्ण जगाचे लक्ष लागलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. दोन्ही देशात अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु, चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स मायदेशात परतले आहेत. पाकिस्तानात झालेल्या या बैठकीत कोणताही निष्कर्ष न निघाल्याचे खापर इराणने अमेरिकेवर फोडले आहे. यातच इस्लामाबाद येथे झालेली शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध भडकणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.