पाकिस्तान म्हणजे पोकळ आव आणून बढाया मारणाऱ्या राजकीय नेत्यांनी ठासून भरलेला देश. ऑपरेशन सिंदूरनंतर तर हे नेते वाट्टेल ते बरळू लागलेत. फुशारक्या मारत आहेत. यात अगदी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारीही आता मागे नाहीत. मे महिन्यात झालेल्या युद्धात पाकिस्ताननं भारताच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिलं असा दावा त्यांनी केलाय. मात्र त्याचवेळी भारताच्या उत्तराला घाबरून बंकरमध्ये जाण्याचीही पाकिस्तानी नेत्यांची तयारी होती, हे देखील त्यांनीच कबूल केलं. पाहूया दुटप्पी पाकिस्तानच्या दुटप्पी नेत्यांची वाचाळ वाणी.