एका देशाच्या अध्यक्षाच्या घरावरच हल्ला करत अमेरिकन सैन्यानं त्यांना त्यांच्या बेडरूममधून अटक केली... ही घटना नववर्षाच्या सुरुवातीलाच घडली. ही घटना आता जगाच्या इतिहासात कायमची कोरली गेलीय. मात्र व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना पकडण्यासाठीची मोहीम काही महिने आधीच सुरु झाली होती. प्रत्यक्षात कारवाई करण्याआधी अमेरिकन सैन्य, गुप्तचर यंत्रणा यांनी नेमकं काय काय केलं, कसं आखलं ऑपरेशन रिझॉल्व्ह आणि कसं राबवण्यात आलं पाहूया या ऑपरेशनची बित्तंबातमी...