जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणखी श्रीमंत होण्याची शक्यता आहे. आम्ही बोलतोय टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्याविषयी... त्यांना भरगच्च पगाराची ऑफर आलीय. ती ऑफरही दिलीय ती त्यांचीच कंपनी असलेल्या टेस्लानं... एलॉन मस्क यांनी सीईओपदी कायम राहावं आणि कंपनीचा अधिक उत्कर्ष साधावा यासाठी टेस्लाच्या कमिटीनं त्यांना तब्बल एक ट्रिलीयन डॉलर म्हणजेच सुमारे ८३ लाख कोटींच्या पगाराची ऑफर दिलीय. जर एलॉन मस्क यांनी ही ऑफर स्वीकारली तर हा इतिहासातील सर्वात मोठा सीईओपदासाठीचा पगार ठरू शकतो. पाहूया नेमकी काय आहे ऑफर आणि यामागचं नेमकं कारण काय आहे. मस्क यांचा प्रतिसाद काय आहे....