सध्या अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक धोरणांमुळे जगात त्यांच्याविषयी, अमेरिकेविषयी एक नाराजी पसरतेय. अशात ट्रम्प यांना अचानक आठवण झालीय ती पाकिस्तानची.... पाकिस्तानलाही कायम अमेरिकेसारख्या महाशक्तीच्या कुबड्यांची गरज असतेच... आंतरराष्ट्रीय निधीची दारं अमेरिकेतूनच खुली होतात. आणि कंगाल पाकिस्तानला सध्या निधीची नितांत गरज आहे, अशात अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिफ मुनीर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यानंतर पाकिस्तान सतत ट्रम्प यांचे गोडवे गातोय. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं. पाकिस्तान-अमेरिका जवळीकीचा भारताला काही फटका बसणार आहे का... पाहूया एक रिपोर्ट....