पुढच्या दशकभरात जगाचा अंत होणार आहे... असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल की ही भविष्यवाणी तर आजवर अनेकदा झाली, असं आजपर्यंत तरी कधी झालं नाही. तुमचं म्हणणं बरोबरही आहे. पण माणसानं त्याच्या जीवघेण्या स्पर्धात्मक स्वभावाला मुरड घातली नाही तर नक्कीच पुढच्या दशकभरात जग संपेल, त्याचा नाश होईल आणि हे सगळं करण्यात आपला हातभार लावणार आहे तो आपला लाडका AI....