Gokul च्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ, गोकुळचा दूध उत्पादकांना दिलासा; नेमकी कितीची वाढ झाली?

गोकुळ दूध संघाने आपल्या इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ जाहीर केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपये, तर गायीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 21 तारखेपासून हे नवे दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांवर भार पडणार असला तरी दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे,

संबंधित व्हिडीओ