गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग, सतेज पाटील यांच्या पॅनलचे संचालक खेचण्याचा प्रयत्न
Moves to elect the chairman of Gokul gain momentum; attempts underway to pull directors from Satej Patil’s panel.
गोकुळमध्ये अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या पेच प्रसंगाचा महायुतीकडून फायदा उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे.. दोन अशासकीय सदस्य नेमून त्यांना मताचा अधिकार देण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू आहेत.. अध्यक्षपद निवडीमध्ये सभेच्या कोरमने निकालामध्ये ट्विस्ट आणलेला आहे.. काँग्रेस प्रणित समविचारी आघाडीला 25 पैकी 13, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या. काँग्रेस समविचारी आघाडीला बहुमत मिळाले असले तरी सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी 14 संचालकांची गरज आहे. कोरमवरून पेच तयार झाल्याने निवड सभेलाच गैरहजर राहण्याची व्यूहरचनेवर महायुतीच्या नेत्यांचा विचार सुरु असतानाच, दुसरीकडे बहुमताचा 14 चा आकडा कसा गाठायचा यासाठी चाचपणी सुरु आहे.