अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धाचे परिणाम अनेक देशांच्या शेअर बाजारावर पडताना दिसताय. त्यातच सोन्या चांदीचे भाव कमी होणार अशी चिन्ह असताना आता पुन्हा एकदा सोने चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे.दोन दिवसांत सोने व चांदीच्या दरात प्रत्येकी 3 हजार 500 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या जळगावात जीएसटीसह सोन्याचे दर 95 हजार 172 रुपयांवर तर जीएसटीसह चांदीचे भाव 97 हजार 335 रुपयांवर आलेत.