गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील कार्यालयात ईव्हीएमवरून गोंधळ सुरुये.. अधिकाऱ्याने 17 ईव्हीएमचे सील उघडून बॅटरी बंद केल्याचा आरोप करण्यात आलाय.. उमेदवारांचे प्रतिनिधी न बोलविता सील का उघडलं असा सवाल आंदोलकांनी केलाय.. दोषी अधिकाऱ्याची चौकशी करून निलंबित करावं अशी मागणी यावेळी करण्यात येतीय.. याप्रकरणी अद्याप एफआयआरही दाखल करण्यात आला नाही. हा सर्व प्रकार लोकशाहीचे वस्त्रहरण करणारा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे..यासंदर्भात सालेकसामधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि ग्रामस्थांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी संजय तिवारींनी पाहुयात