अकोला जिल्ह्यातील २४८ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.