GTA 6 च्या चाहत्यांसाठी Good News, 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर GTA 6 जगभरात लॉन्च | सखोल विश्लेषण

गेमिंग विश्वातील सर्वात बहुप्रतिक्षित गेम Grand Theft Auto VI अर्थात GTA 6 अखेर जगभरात लॉन्च झाला आहे. तब्बल 13 वर्षांनंतर आलेल्या या गेमची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. लॉन्चपूर्वीच 1.5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त प्री-ऑर्डर्स मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, सुरुवातीच्या समीक्षणांमध्ये या गेमला मास्टरपीस आणि आतापर्यंतच्या सर्वोत्तम व्हिडिओ गेम्सपैकी एक अशी प्रतिक्रिया मिळत आहे.GTA मालिकेचा शेवटचा मुख्य गेम 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल 13 वर्षे चाहत्यांनी GTA 6 ची प्रतीक्षा केली. गेम लॉन्च होताच जगभरातील गेमर्सनी जल्लोष सुरू केला. लंडनमध्ये अनेक विद्यार्थी आणि गेमिंग इन्फ्लुएन्सर्सनी मध्यरात्री काउंटडाउन करत लॉन्चचा आनंद साजरा केला. काही चाहत्यांनी तर याला आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असे संबोधले.

संबंधित व्हिडीओ