मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. कारण गायमुख ते भक्ती पार्क दरम्यान धावणारी ३५ किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन ४, म्हणजेच ग्रीन लाईन, शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाली आहे. वडाळा ते गायमुख-ठाणे दरम्यानची मेट्रो ४ आणि ४-अ ही सेवा डिसेंबर महिन्यात सुरू होण्याच्या तयारीत असल्याने मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून लवकरच सुटका होणार आहे.