मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात ही धक्कादायक घटना घडली आहे. नराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या कॉन्सर्टच्या आयोजक आणि नेस्को सेंटरचा व्यवस्थापक यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे... नेस्को संकुलात एका कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं.. यावेळी तरुण तरुणींनी ड्रग्ज घेतल्याचं उघडकीस आलंय.. आता प्रश्न असा आहे की या पार्टीत तरुणांनी ड्रग्ज नेलंच कसं?.. त्यांची तपासणी झाली नाही का?... पुण्यानंतर आता मुंबईतही तरुणांमध्ये ड्रग्ज घेण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतंय..