माझी जिविची आवडी...पंढरपुरा नेईन गुढी.साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या आणि मराठी नववर्षाची सुरुवात असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात विठ्ठलभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त पाचशे किलो फुलांपासून विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली. तर विठ्ठलाच्या गळ्यामध्ये आज साखरेची गाठी देखील परिधान करण्यात आली आहे. एकंदर भक्तीमय वातावरणात पंढरपुरात मराठी नववर्षाचे स्वागत होत आहे. याचबाबत थेट विठ्ठल मंदिरातून एकंदर सजावटीचा आणि पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...