Gudi Padwa 2025| गुढीपाडव्यादिवशी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर, 4 हजारांहून अधिक पोलीस तैनात

आज गुढीपाडव्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. तसंच शहरातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारही उपस्थित राहणार आहेत.मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे.दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त 4 हजारांहून अधिक पोलीस तैनात राहणार आहेत.

संबंधित व्हिडीओ