Gudipadwa 2025|जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा...राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह | NDTV मराठी

मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.आज राज्यभरात आनंदाच्या, चैतन्याच्या, आरोग्यदायी गुढ्या उभारल्या जाणार आहेत.नागपूर, नाशिक, पुणे, डोंबिवली,गिरगावात शोभायात्रा निघणार आहे.जागोजागी रांगोळ्या साकारण्यात आल्यात.नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आजचा दिवस उत्साहात साजरा केला जाणार आहे.लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करत मराठी माणसांसह, मराठी कलाकार, राजकीय पुढारी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सामील होऊन गुढीपाडवा साजरा करतील. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जाईल.

संबंधित व्हिडीओ