कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. कारण आता राजधानी एक्स्प्रेससह तीन महत्त्वाच्या रेल्वे आता सावंतवाडी स्टेशनवर थांबणार आहेत. यामध्ये देशातली प्रतिष्ठेची मानली जाणारी राजधानी एक्स्प्रेस तसंच मंगळुरु एक्स्प्रेस आणि गरीब रथ एक्स्प्रेसचाही समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला यश आलंय. या थांब्यासाठी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनीही पाठपुरावा केला होता. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सावंतवाडीच्या थांब्यासंदर्भात अधिकृत मंजुरीचं पत्र जारी केलं.