गेल्याच महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धनने दुसऱ्यांदा गदा जिंकून सातवा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र याचवेळी त्याने आपल्याला शासकीय नोकरी मिळत नसल्याची खंत जाहिरपणे व्यक्त केली होती...त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलंय...हर्षवर्धनबाबत शासन निर्णय घेईल...पण त्यांना क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी हवी मात्र कायद्यात तशी तरतूद नसल्याच स्पष्टीकरण दिलंय....