वाशिममधील गोंडेगावात उघड्या नाल्यात पडून ४ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मामाकडे गेलेला स्वराज खिल्लारे नाल्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी जेसीबीने शोधमोहीम सुरू करण्यात आली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेमुळे गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.